IND vs SL, 2nd Test, Day 1 | दिवसअखेर श्रीलंकेच्या 86 धावा आणि 6 विकेट

IND vs SL, 2nd Test, Day 1 | दिवसअखेर श्रीलंकेच्या 86 धावा आणि 6 विकेट

Published by :
Published on

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा कसोटी (Second Test) सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत (India) 1-0 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकून श्रीलंकेला (Srilanka) क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. उभय संघांमध्ये दुसरी कसोटी डे-नाईट म्हणजेच गुलाबी चेंडूने (pink ball test match) खेळवली जात आहे. भारतीय संघाची गुलाबी चेंडूची ही चौथी कसोटी आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्याद्वारे कर्णधार म्हणून पहिल्यांदाच पिंक बॉल टेस्ट (pink ball test match) खेळत आहे.

विश्वा फर्नांडोने दुसरे षटक टाकले. या षटकात मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) धावबाद झाला. ओव्हरचा चौथा चेंडू मयंकच्या पॅडला लागला पण अंपायरने LDW दिले नाही. मयंक धाव घेण्यासाठी पळू लागला पण रोहितने (Rohit Sharma) त्याला माघारी पाठवले. दरम्यान, जयविकर्माने त्याला पॉईंटवरून धावचित केलं. त्याने चार धावांचं योगदान दिलं. भारताने दुसरी विकेट गमावली आहे. 10 व्या षटकात लसिथ एम्बुल्डेनियाने रोहित शर्माला (Rohit Sharma) त्रिफळाचित केलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com