India A vs Pakistan A: टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आज मुकाबला; कुठे पाहाल सामना?

India A vs Pakistan A: टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आज मुकाबला; कुठे पाहाल सामना?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ACC मेन्स एमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 स्पर्धेअंतर्गत खेळवला जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

India A vs Pakistan A: टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ACC मेन्स एमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 स्पर्धेअंतर्गत खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं ग्रुप स्टेजमधील पहिला सामना UAE विरुद्ध खेळला होता, ज्यात 8 विकेट्सनी विजय मिळवला होता.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेतील हा बारावा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी होईल. एमर्जिंग आशिया चषक स्पर्धेतील भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' सामना आज (19 जुलै) कोलंबोमधील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारत 'अ' आणि पाकिस्तान 'अ' यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील या 12व्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com