भारत – बांगलादेश सामना निघाला बरोबरीत

भारत – बांगलादेश सामना निघाला बरोबरीत

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील भारत-बांगलादेशमधील सामना बरोबरीत निघाला आहे. दोन्ही संघाना १-१ चं गोल करता आला.

भारतासाठी १२१ वा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीने २७व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरा पर्यंत भारताने ही आघाडी टिकवून ठेवली.नंतर बांगलादेशच्या विश्वनाथ घोषला ५४ व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आला आणि यामुळेच त्यांना १० खेळाडूसह खेळावे लागले. त्यानंतर येसिन अराफतने ७४ मिनिटाला बरोबरीचे गुण मिळवून दिले. आणि भारताचे आणि बांगलादेशचे प्रत्येकी एक-एक गुण मिळाले. सध्या गुणतालिकेत बांगलादेश चार गुणसह गटात अग्रस्थानी आहे तर भारत तिसऱ्या स्थानी आहे.

गुरुवार ७ ऑक्टोंबरला भारत आणि श्रीलंकेची स्पर्धा होणार असून नेमकी बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com