भारताला विजयी चौकार लगावण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज

भारताला विजयी चौकार लगावण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज

वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. बांगलादेशने भारतासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पुणे : वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. बांगलादेशने भारतासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशी संघाने 8 गडी गमावून 256 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले.

भारताला विजयी चौकार लगावण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज
...अन् बॅटिंग नव्हे तर विराट कोहली बॉलिंगसाठी मैदानात

नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. बांगलादेशचे सलामीवीर तनजीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 14.4 षटकांत 93 धावा जोडल्या. बांगलादेशकडून तनजीद हसनने हसनने केवळ 41 चेंडूत अर्धशतक केले.

तर, कुलदीप यादवने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले आहे. त्याने बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसनला (51) बाद केले. यानंतर चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशी फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे बांगलादेशचा संघ केवळ 256 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले. याशिवाय शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

दरम्यान, हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. हार्दिक पांड्या भारतासाठी नववे षटक टाकण्यासाठी आला, मात्र अवघ्या 3 चेंडू टाकल्यानंतर तो जखमी झाला. यानंतर हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्या फलंदाजीला येणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com