...अन् बॅटिंग नव्हे तर विराट कोहली बॉलिंगसाठी मैदानात

...अन् बॅटिंग नव्हे तर विराट कोहली बॉलिंगसाठी मैदानात

वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गोलंदाजी करताना जखमी झाला. यामुळे त्यांला मैदानातून बाहेर जावे लागले. पांड्याचे ओव्हर विराट कोहलीने पूर्ण केले.

...अन् बॅटिंग नव्हे तर विराट कोहली बॉलिंगसाठी मैदानात
भारताला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्ध हार्दिक पांड्याला दुखापत

बांगलादेशविरोधात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला शानदार गोलंदाजी केली. सामन्यातील आपले पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याने लिटन दासचा फटका पायाने रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यादरम्यान तो पडला. यामुळे पांड्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. हार्दिक पंड्याच्या पायाला पट्टी बांधण्यात आली होती.

यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अडचण येत असल्याने अखेर त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर विरोट कोहलीने धुरा सांभाळत ओव्हर पूर्ण केले.  विराटने पांड्याच्या षटकातील उरलेले तीन चेंडू टाकले. विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यामध्ये सहा वर्षांनंतर गोलंदाजी केली. 

दरम्यान, बांगलादेशकडून तनजीद हसनने अर्धशतक केले आहे. हसनने केवळ 41 चेंडूत अर्धशतक केले आहे. हसनच्या खेळीत 5 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर, कुलदीप यादवने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले आहे. त्याने बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसनला (51) बाद केले.

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेशचे प्लेइंग इलेव्हन

लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com