IND VS PAK: भारताने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली; रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 6 धावांनी केला पराभव

IND VS PAK: भारताने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली; रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 6 धावांनी केला पराभव

T-20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होत होता. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला गेला.
Published by :
Dhanshree Shintre

T-20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होत होता. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 119 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला.

भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. एकवेळ 14व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा होती. यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. रिझवान-शादाब बाद झाले आहेत. जसप्रीत बुमराह 19व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली.

20 व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने केवळ 11 धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य मध्ये बदलले. टीम इंडियाचा पराभव निश्चित वाटत होता, पण बुमराह-अर्शदीप, सिराज आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीच्या चौकडीने भारताला विजय मिळवून दिला.

T-20 वर्ल्ड कप टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

T-20 वर्ल्ड कप टीम पाकिस्तान

बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com