World Cup 2023 Team India: विश्वचषकासाठी भारताच्या 15 शिलेदारांच्या नावांची घोषणा; पाहा कुणाला मिळाली संधी

World Cup 2023 Team India: विश्वचषकासाठी भारताच्या 15 शिलेदारांच्या नावांची घोषणा; पाहा कुणाला मिळाली संधी

विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 जणांची निवड करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी याची घोषणा केली
Published by  :
Siddhi Naringrekar

विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 जणांची निवड करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी याची घोषणा केली. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे.

श्रीलंकेत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगरकर आणि रोहित या दोघांची पत्रकार परिषद पार पडली. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

रोहित शर्मा (कर्णधार) विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com