T20 World Cup 2024
T20 World Cup 2024

USA विरोधात 'या' स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट; कोहलीच्या फलंदाजी नंबरमध्येही होणार बदल, कोण मारणार एन्ट्री? जाणून घ्या

टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाचा तिसरा सामना यूएसए विरोधात १२ जूनला होणार आहे.
Published by :

India Predicted Playing XI vs USA, T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाचा तिसरा सामना यूएसए विरोधात १२ जूनला होणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. हा सामना जिंकून सुपर ८ मध्ये जागा पक्की करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. अशातच दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. यूएसए विरोधात भारतीय संघ कोणत्या प्लेईंग ११ सोबत मैदानात उतरणार आहे, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल उतरणार सलामीला?

भारताच्या पुढील सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल सलामीला उतरू शकतो. ब्लू टीमने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला खेळवलं आहे. परंतु, दोन्ही सामन्यांमध्ये शिवमला चमकदार कामगिरी करता आली नाही. तसच विराट कोहलीलाही या सामन्यांमध्ये धावांचा सूर गवसला नाही. अशातच जैस्वालच्या पुनरागमनाने कोहलीली तिसऱ्या क्रमांकाचं त्यांचं फेव्हरेट स्थान मिळणार आहे.

या खेळाडूंवर असणार मध्यमक्रमाची मदार

यूएसएच्या विरोधात मध्यमक्रमची जबाबदारी विराह कोहलीसह युवा फलंदाज रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादववर असणार आहे. या टी-२० वर्ल्डकपमध्ये पंतने अप्रतिम कामगिरी केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करुन विराटने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीबाबत सर्वांनाच ठाऊक आहे.

या अष्टपैलू खेळाडूंवर कर्णधार रोहित शर्मा ठेवणार विश्वास

यूएसएच्या विरोधात कर्णधार रोहित शर्मा ३ अष्टपैलू खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे. यामध्ये हार्दिक पंड्यासोबत रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलचं नाव निश्चित आहे. या तिन्ही खेळाडूंनी टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

USA विरोधात 'अशी' असेल भारताची प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com