भारतीय संघ आता नेदरलँड्सशी दोन हात करणार; जाणून घ्या कधी, कुठं होणार सामना?
नेदरलँड्सनं गेल्या चारपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत. ज्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव झालाय, त्या सामन्यात त्यांनी विरोधी संघाला कडवी झुंज दिली आहे. नेदरलँड्सचा श्रीलंकेविरुद्ध 16 धावांनी तर, बांग्लादेशकडून अवघ्या नऊ धावांनी पराभव झाला. अशा परिस्थितीत नेदरलँड्सला हलक्यात घेणे भारतीय संघाला महागात पडू शकतं.
भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना आज गुरूवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12.30 वा. सुरू होईल. तर, अर्धातास अगोदर नाणेफेक होईल.
असा असेल भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल.