India VS New ZealandTeam Lokshahi
क्रीडा
उद्या होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेला सुरुवात; जाणून घ्या कुठे, कधी राहील सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवली जाणार आहे.
नुकताच भारतीय संघाने श्रीलंकेला क्लीन स्वीप केल्यानंतर आता न्यूझीलंड संघ आता भारताचा दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. यातील एकदिवसीय मालिकेला उद्यापासून म्हणजेच बुधवार 18 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद
दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर
तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर
न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (क्षेत्ररक्षक), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.