India vs South Africa, T20 World Cup 2024
India vs South Africa, T20 World Cup 2024

T20 World Cup Final 2024 Live Streaming: भारत-दक्षिण आफ्रिकेत आज रंगणार महामुकाबला; भारतात कधी आणि किती वाजता पाहणार लाईव्ह सामना? जाणून घ्या

बारबाडोसमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया पुन्हा एकदा विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

IND vs SA Final : बारबाडोसमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया पुन्हा एकदा विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरीकडे वर्ल्डकपच्या सर्व फॉर्मेटमध्ये सेमीफायनल सामन्यात सतत पराभव झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे. टी-२० क्रिकेट टूर्नामेंटच्या इतिहासात दोन्ही संघ सहावेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेनं २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आता भारतीय संघ हा सामना जिंकून १३ वर्षांची प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न करेल. याआधी भारताने २०१३ मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने

खेळलेले एकूण सामने - ६

भारत - ४

दक्षिण आफ्रिका - २

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० चे एकूण सामने

टी २० क्रिकेटमध्ये एकूण सामने - २६

भारत - १४

दक्षिण आफ्रिका - ११

सामना कधी होणार?

शनिवार, २९ जून, भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता

सामना कुठे होणार?

केंसिंग्टन ओवल, ब्रिजटाऊन, बारबाडोस

फायनल सामन्याचं भारतात टीव्हीवर होणार थेट प्रक्षेपण

स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टूर्नामेंटला हिंदी, तामिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रसारित करेल.

भारतात वर्ल्डकप २०२४ फायनल लाईव्ह स्ट्रिमिंग

लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्नी + हॉटस्टारवर सुरु असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com