India vs South Africa
India vs South Africa

IND vs SA Final Barbados Weather Updates: बारबाडोसमध्ये 'असा' आहे हवामानाचा रिपोर्ट; पाऊस थांबलाच नाही, तर काय होणार? जाणून घ्या

टी-२० वर्ल्डकप २०२४ चा फायनलचा महामुकाबला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बारबाडोसच्या मैदानात आज रात्री ८ वाजता रंगणार आहे.
Published by :

Barbados Weather Live Updates; IND vs SA Final : टी-२० वर्ल्डकप २०२४ चा फायनलचा महामुकाबला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बारबाडोसच्या मैदानात आज रात्री ८ वाजता रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून वर्ल्डकप चषकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. बारबाडोसच्या के केंसिंग्टन ओवल मैदानात दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात निर्णायक सामना होणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीसाठी पोषक असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, तर मिडल ओव्हर्समध्ये फिरकीपटूंना ही खेळपट्टी पोषक ठरते.

काय आहे पावसाचा अंदाज?

ढगाळ वातावरण असल्याने दुपारच्या सत्रात पाऊस पडण्याची ९९ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. राखीव दिवस ३० जूनसाठीही हवामानाची भविष्यवाणी निराशाजनक आहे. रिपोर्टनुसार, ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. सकाळी हवा वेगानं सुरु राहिल. तर दुपारी अधूनमधून पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल

दक्षिण आफ्रिकेचा संघ

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को जेनसन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेज शम्सी, ओटनील बार्टमॅन, गेराल्ड कोएट्जी, ब्योन फोर्टुइन, रेयान रिकेल्टन.

पाऊस थांबला नाही, तर फायनलसाठी काय आहे राखीव दिवसाची व्यवस्था?

फायनल सामन्यासाठी ३० जून राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर उर्वरित सामना ३० जूनला राखीव दिवशी खेळवण्यात येईल. जर राखीव दिवसाचा पर्याय घेतला, तर काही नियमांचा वापर केला जाईल. सामन्यात पावसाने खोडा घातल्यास अतिरिक्त १९० मिनिटांची वेळ देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com