India Vs New ZealandTeam Lokshahi
क्रीडा
IND vs NZ : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
भारताचा सूर्यकुमार ठरला विजयाचा शिलेदार
भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. याच दौऱ्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर आज दुसरा सामना खेळवला जात गेला. याच दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंड दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव नावाचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं.
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात ठिकठाक झाली. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या 51 चेंडूत नाबाद 11 1 धावांच्या जोरावर भारताने 191 चे आव्हान न्यूझीलंड समोर ठवले. त्यानंतर लक्ष्य गाठण्यासाठी न्यूझीलंड मैदानात आली आहे. मात्र, न्यूझीलंडचा संघ 126 धावांत सर्वबाद झाला.