India vs England 4th Test: भारताने 3-1 ने कसोटी मालिका जिंकली

India vs England 4th Test: भारताने 3-1 ने कसोटी मालिका जिंकली

Published by :

चौथ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे.या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे.अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीने हा विजय निश्चित झाला.

भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत भारताच्या नावावर अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे.

तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 365 धावांवर ऑल आऊट झाला. त्यामुळे भारतीय संघाने 160 धावांची आघाडी घेतली होती. यामध्ये वॉशिंग्टन 96 धावांवर नाबाद राहिला. ऋषभ पंत 101 धावा करून आऊट झाला. शुभमन गील शून्य धावांवर बाद झाला. रोहित शर्मा अर्धशतकापासून चुकला त्याने 49 धावा केल्या. पुजारा 17, विराट कोहली शून्य धाव, अजिंक्य 27, रविचंद्रन अश्विन 13 धावा केल्या आहेत.

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर ऑल आऊट केलं होतं. दुसऱ्या डावात मात्र इंग्लंडचा संघ १३५ धावांमध्येच गारद झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com