भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by  :
Team Lokshahi

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, पहिला उपांत्य सामना आज होणार आहे. या सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने भारतीय क्रिकेटप्रेमीचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. 2011 नंतर अंतिम फेरीत पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com