भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक; जाणून घ्या कारण…

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक; जाणून घ्या कारण…

Published by :
Published on

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. वांद्र्यातील रहिवाशी सोसायटीच्या गेटला कार धडकवल्याचा आरोपाखाली त्याला अटक झाली होती. यानंतर पोलिसांनी कांबळीला अटक करत जामिनावर सोडलं आहे.

क्रिकेटपेक्षा वादांमुळे विनोद कांबळी चर्चत राहीला आहे. विनोद कांबळीवर वांद्र्यातील रहिवाशी सोसायटीच्या गेटला कार धडकवल्याचा आरोप आहे. कांबळी राहत असलेल्या सोसायटीचा हा गेट आहे. दारूच्या नशेत, समोरून येणाऱ्या कारने गेटला धडक दिली होती. गाडी धडकवल्याच्या प्रकारानंतर विनोद कांबळीने संकुलाचा वॉचमन आणि काही रहिवाशांबरोबर वाद घातला.

कांबळीच्याच सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीने कांबळीवर गुन्हा दाखल केला होता. विनोद कांबळीवर आयपीसीचं कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवण), कलम 336 दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं आणि कलम 427 या कलमांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्याला आधी अटक करण्यात आली. नंतर जामिनावर त्याची सुटका झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com