ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार विश्वचषकासाठी भारतीय संघ
क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्वच देशांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु, दुसरीकडे बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा करणार, हा प्रश्न भारतातील चाहत्यांना पडला आहे. दरम्यान आता त्याबाबत मोठी अपडेट आली आहे. 21 ऑगस्टला बीसीसीआय आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर करणार आहे. आशिया चषकासोबतच विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची 5 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे बीसीसीआयला 5 सप्टेंबरपर्यंत संघाच्या खेळाडूंची नावं द्यावी लागतील. मात्र 27 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक क्रिकेट बोर्डाला या नावांमध्ये बदल करता येईल. त्यामुळे संघात एखाद्याला काढून त्याच्या जागी दुसऱ्याला संधी देता येईल. मात्र तो बदल 27 सप्टेंबरपर्यंतच करता येईल.