Kho Kho Women's World Cup 2025: चक दे इंडिया! नेपाळचा दारुण पराभव अन् भारतीय महिला खो खो संघाने खो-खो स्पर्धेत मारली बाजी
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे झालेल्या खो-खो वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने दणक्यात प्रवेश केला होता. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून सातत्याने विजय मिळवत असलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरीतही आपले वर्चस्व कायम राखले.
दक्षिण आफ्रिकेचा 50 पाईंटच्या फरकाने पराभव केला. आणि आता भारतीय टीमनं एकही मॅचमध्ये न गमावता भारतीय महिला खो-खो संघानं जागतिक खो खो स्पर्धा जिंकत हा पराक्रम केला. यावेळी भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळचा 78-40 अशा अंकांनी पराभव केला तसेच त्याआधी भारतीय टीमनं ईराण, द. कोरिया, मलेशिया यांचा देखील पराभव केला.
भारतीय महिला खो-खो संघाची उत्कृष्ट खेळी
भारताने ग्रुप स्टेजमध्ये त्यांचे तिन्ही सामने जिंकून उत्कृष्ट धावा केल्या होत्या. केवळ 54 गमावून त्यांनी एकूण 375 गुण मिळवले. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशला 109-16 च्या जबरदस्त स्कोअरसह पराभूत केले. यानंतर उपांत्य फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अप्रतिम कामगिरी करत 66-16 असा विजय मिळवला. शेवटी अंतिम फेरीत, भारताने नेपाळविरुद्ध आपले श्रेष्ठत्व दाखवून आणखी एक प्रभावी कामगिरी करून विजेतेपद पटकावले. हा विजय भारतीय महिला खो-खो संघासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला कारण त्यांनी अपवादात्मक मोहिमेनंतर प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली.