Neeraj Chopra: भारताचा स्टार ॲथलीटने गुपचुप बांधली लग्नगाठ, कोण आहे नीरजची पत्नी? जाणून घ्या...
भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा हा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेकीत दोन पदकं जिंकणारा पहिला खेळाडू आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्यपदक जिंकलं आहे. ऑलिंपिक भालाफेकपटू नीरज चोप्राबद्दल नुकतीच एक बातमी समोर आली आहे. नीरजने जवळच्या आणि मोजक्या माणसांमध्ये त्याचा लग्नसभारंभ उरकुन घेतला आहे. अधिकृत अंकाऊटवर पोस्ट करत नीरजने त्याच्या पत्नीचे नाव 'हिमानी' असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
अधिकृत अंकाऊटवर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'जीवनाच्या नव्या चॅप्टरमध्ये आपल्या कुटुंबाची साथ' . आम्हाला या क्षणी एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ. प्रेमाने बांधलेले, आनंदाने कधीही नंतर. नीरज हिमानी' असे कॅप्शन लिहीले आहे.नीरजच्या लग्नाची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. जेव्हा जेव्हा नीरज कोणत्याही मुलाखत द्यायचा त्याला लग्नासंबंधी प्रश्न विचारले जायचे. पण नीरजने लग्नाबाबत नेहमीच मौन बाळगले. आता नीरजने लग्नाची बातमी सांगून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
कोण आहे नीरजची पत्नी हिमानी मोर?
हिमानीने सुरुवातीचे शिक्षण सोनीपत जिल्ह्यातील लिटल ईगल्स पब्लिक स्कूलमधून केले. योगायोगाने ही तीच शाळा आहे जिथून भारताचा नंबर-1 टेनिसपटू सुमित नागलनेही शिक्षण घेतले आहे. हिमानी महिला टेनिसचे प्रशिक्षण, भरती, बजेट आणि वेळापत्रक देखील पाहते. तसेच, ती सध्या अमेरिकेतून स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. खेल इंडियाच्या मते 2017 मध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती.
नीरजने जिकंलेली पदके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले होते. त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अलीकडेच, नीरज चोप्राला २०२४ मध्ये ‘ट्रॅक अँड फील्ड न्यूज’ या अमेरिकन मासिकेने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित केले. तर नीरजने कॅलिफोर्निया-आधारित मासिकाच्या २०२४ रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.