हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन; आयपीएल IPL सोडून गेला घरी

हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन; आयपीएल IPL सोडून गेला घरी

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (ROYAL CHALLENGERS BANGALORE) चा खेळाडू हर्षल पटेल (HARSHAD PATEL) याच्या बहिणीचे निधन झाले. त्यामुळे त्याला आयपीएल अर्धवट सोडून घरी परतावे लागले आहे. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (MUMBAI INDIANS) विरुद्ध सामना खेळत असताना त्याला ही बातमी समजली. पीटीआयच्या वृत्तानुसार तो एका दिवसासाठी घरी गेला आहे. 12 एप्रिल सी एस के CSK विरुद्ध च्या सामन्यासाठी तू पुन्हा परत येइलअसे सांगितले जात आहे. पण क्वारंटाईन च्या नियमामुळे ते शक्य होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन; आयपीएल IPL सोडून गेला घरी
IPL 2022: विराटच्या चाहत्याने असं काय केलं की तो गेला गजाआड

हर्षल पटेल मागील दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रतिनिधीत्व करतो. तो संघातील स्टार खेळाडू आहे. पुण्याच्या मैदानात झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या सामन्यानंतर संघाच्या बसमध्ये न जाता तो घरी निघून गेला. सामन्यादरम्यानच त्याला घरी घडलेली दुख:द घटना समजली. सामना झाल्यावर तो बायोबबलमधून बाहेर पडला.

हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन; आयपीएल IPL सोडून गेला घरी
आयपीएलचा IPL सामना सुरू असताना अचानक एक चाहता मैदानात घुसला, वाचा पुढे काय झालं ते...

IPL 2022 च्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चार सामने खेळले आहेत. यात त्यांनी तीन सामन्यातील विजयासह दमदार कामगिरी करुन दाखवलीये. संघाच्या विजयात रॉयल चॅलेंजर्सची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मागील हंगामात त्याने सर्वाधिक विकेटसह पर्पल कॅप पटकावली होती. यंदाही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com