Hardik Patil Ironman
Hardik Patil Ironman Team Lokshahi News

Hardik Patil Ironman : आर्यनमॅन हार्दीक पाटील यांचे तब्बल दोन आठवड्यांमध्ये दोन नविन साहसी विक्रम

हार्दिक यांच्या कामगिरीमुळे विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

पंकज राणे : विरार | विरारचे आयर्नमॅन हार्दिक दयानंद पाटील (Hardik Patil Ironman) यांनी 17 वी ' कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा 2022' यशस्वीरित्या नुकतीच पुर्ण केली. यात महत्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्येच नेदरलँड देशातील अँमस्टरडॅम येथे पार पडलेली TCS मॅरेथॉन स्पर्धा देखील पाटील यांनी एक दोन वेळा नव्हे तर तब्बल नव्यांदा पूर्ण केली आहे.

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात चार किलाे मीटर पोहणे, (180.2 किलाे मीटर) सायकल चालवणे आणि (42.2 किलाे मीटर धावणे) यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. सतरा तासांच्या कालावधीत ही आव्हानं सर करावी लागतात.

Hardik Patil Ironman
आयर्नमॅन हार्दिक पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या

यापूर्वी वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून हार्दिक पाटील यांनी ज्युनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे. 2015 मध्ये पहिल्यांदाच फुल आयर्नमॅनचा किताब पटकावून आर्यनमॅन हार्दिक दयानंद पाटील यांनी आपली घोडदौड सुरु केली होती.

हार्दिक पाटील यांनी चार वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच चार वेळा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमांच्या नोंदी नोंदविल्या आहेत. हार्दिकने आजवर शिकागो, न्यूयॉर्क, टोकियो, बोस्टन, लंडन, न्यूझीलँड, मेक्सिको, डेन्मार्क, तैवान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात जाऊन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.

क्रीडा असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो, कितीही व्यस्त असाल तरी दिवसातला किमान एक तास तरी फिटनेससाठी द्या. कोणतेही यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत, जिद्द आणि आपला फोकस किती आहे हे देखील महत्त्वाचे असते.
- हार्दिक पाटील, आयर्नमॅन

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com