Jay Shah On Rohit Sharma
Rohit Sharma Lokshahi

बारबाडोसमध्ये झेंडा फडकवला! आता पाकिस्तानमध्येही 'तिरंगा' फडकणार, जय शहांनी आखली रणनीती; म्हणाले, "रोहित शर्मा..."

टी-२० वर्ल्डकपनंतर मिळालेल्या यशानंतर रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शहाने रोहित शर्माच्या करिअरबाबत मोठं विधान केलं आहे.
Published by :

Jai Shah On Rohit Sharma : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात ११ वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. टी-२० वर्ल्डकपनंतर मिळालेल्या यशानंतर रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शहाने रोहित शर्माच्या करिअरबाबत मोठं विधान केलं आहे. तसच शहांनी हिटमॅनच्या कॅप्टन्सीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे. बीसीसीआयने जय शहा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रोहित शर्मा २०२५ मध्ये खेळवण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सच्या फायनल सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी टीम इंडिया पुन्हा एकदा इतिहास रचेल. रोहितच्या नेतृत्त्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपही जिंकेल, असा विश्वास जय शहा यांनी व्यक्त केला आहे.

बीसीसीआयने सचिव जय शहा यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. जय शहा म्हणाले, २३ नोव्हेंबरला वर्ल्डकपमध्ये आपण १० सामने जिंकले. परंतु, आपल्याला ट्रॉफी जिंकला आली नाही. त्यानंतर राजकोटमध्ये मी म्हटलं होतं, आम्ही २९ जूनला कप जिंकून बारबाडोसमध्ये झेंडा फडकवून लोकांची मनं जिंकू. आमचे कर्णधार रोहित शर्माने तिथे तिरंगा झेंडा फडकवला. या विजयानंतर आयसीसीचा पुढचा इव्हेंट चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सच्या फायनल खेळायची आहे. मला रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही पुन्हा एकदा चॅप्मियन होऊ.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com