IPL 2024 : के एल राहुल स्वस्तात माघारी; चाहते भडकले, म्हणाले, "राहुलवर विश्वास नाही..."
आयपीएलचा हंगाम संपल्यावर टी-२० वर्ल्डकपचा थरार सुरु होणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी भारताच्या निवड समितीला अपेक्षित अशी कामगिरी करावी, जेणेकरून त्यांच्यावर असलेला दबाव कमी होईल. के एल राहुलकडूनही अशाच प्रकारची आशा आहे. राहुलने आजच्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात झालेल्या नाणेफेकीदरम्यान चाहत्यांना धक्का दिला. कारण राहुलऐवजी निकोलस पूरन नाणेफेक करण्यासाठी मैदानावर आला होता. परंतु, राहुल जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांना वाटलं की, राहुल यावेळीही चमकदार कामगिरी करेन.
परंतु, एक चौकार आणि षटकार ठोकून राहुलने चाहत्यांना खूश केलं होतं. राहुलकडून धावांचा पाऊस पडेल, असं चाहत्यांना वाटलं. पण अर्शदीपने राहुलला बाद केलं आणि चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. कारण राहुल ९ चेंडूत फक्त १५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर चाहत्यांनी राहुलवर भन्नाट मिम्स करून सोशल मीडियावर व्हायरल केले.