CSK vs RCB, IPL 2024
CSK vs RCB, IPL 2024

धोनी-कोहली आमनेसामने, उद्यापासून सुरु होणार 'IPL'चा थरार; 'अशी' आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

आयपीएलच्या १७ व्या हंगामाचा थरार उद्या २२ मार्चपासून सुरु होणार असून चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एम चिंदबरम स्टेडियममध्ये आमनेसामने उतरणार आहेत.
Published by :

आयपीएलच्या १७ व्या हंगामाचा थरार उद्या २२ मार्चपासून सुरु होणार असून चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एम चिंदबरम स्टेडियममध्ये आमनेसामने उतरणार आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानात कंबर कसायला सुरुवात केलीय. सीएसके आणि आरसीबीच्या संघात दिग्गज खेळाडू सामील आहे. तसंच दोन्ही संघातून विदेशी खेळाडूही मैदानात उतरणार आहेत. आयपीएलच्या सुरुवातीलाच सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत. अशातच धोनी आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. जाणून घेऊयात दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग ११ बाबत सविस्तर माहिती.

सीएसकेनं जिंकलेत पाचपैकी चार सामने

दोन्ही संघांमध्ये २०२१ पासून २०२३ पर्यंत खेळलेल्या मागील पाच सामन्यांमध्ये सीएसकेनं चार सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला एका सामन्यातच विजय संपादन करता आलं आहे. २०२१ च्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळवले गेले आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये धोनीच्या सीएसकेनं बाजी मारली. यानंतर २०२२ मध्येही सीएसके आणि आणि आरसीबी यांच्यात दोन सामने रंगले. ज्यामध्ये एक सामना सीएसकेनं जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. दोन्ही संघांमध्ये मागील सामन्यात एकच सामना खेळवला गेला होता. या सामन्यात सीएसकेनं आरसीबीचा ८ धावांनी पराभव केला होता.

घरेलू मैदानावर सीएसकेचा दबदबा

धोनीचा सीएसकेचा संघ आपल्या घरेलू मैदानावर एम चिंदबरम स्टेडियमवर या हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. सीएसकेला त्यांच्या घरेलू मैदानावर पराभूत करणं, कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. घरेलू मैदानाची परिस्थिती पाहून संघाची निवड करण्यात सीएसके माहीर आहे. ज्यामध्ये फिरकी गोलंदाजांना संघात संधी दिली जाते. सीएसकेच्या तुलनेत आरसीबीकडे दिग्गज फिरकीपटू नाहीयत.

'अशी' आहे दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग ११

चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, डेरिल मिशेल, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजूर रहमान

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, रीस टॉप्ली, मोहम्मद सिराज, करण शर्मा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com