IND vs PAK
IND vs PAK

IND vs PAK: भारतात महामुकाबल्याचं थेट प्रक्षेपण कुठे, केव्हा आणि कसं पाहणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये उद्या ९ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Published by :

India vs Pakistan Match Live Telecast Details : टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये उद्या ९ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. न्यूयॉर्कच्या मैदानात भारत-पाकिस्तानचा संघ आमने-सामने येणार आहे. टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये शानदार सुरुवात केली आहे. आर्यलँड विरोधात झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजयाची मोहोर उमटवली आहे. तर पाकिस्तानचा पहिल्याच सामन्यात दारुण पराभव झाला.

आता ९ जूनला दोन्ही संघ ऐकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. भारत-पाकिस्तानच्या सामन्यावर तमाम चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तत्पूर्वी, या सामन्याशी संबंधीत सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा सामना, कधी, कठे आणि कसा लाईव्ह पाहता येईल, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

भारत-पाकिस्तान सामना कधी खेळवला जाणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा महामुकाबला ९ जूनला खेळवला जाणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाओ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे.

सामना किती वाजता सुरु होईल?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात रंगणारा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग कुठे पाहाल?

भारतीय संघाच्या या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. तसच मोबाईलवर हॉटस्टार अॅपच्या माध्यमातूनही हा सामना पाहू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com