Koneru Humpy
Koneru Humpy

Koneru Humpy : दिव्या देशमुखनंतर कोनेरू हम्पीनेही अंतिम फेरीत मारली धडक

FIDE महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 मध्ये भारताने यश मिळवत जागतिक बुद्धिबळात इतिहास रचला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

( Koneru Humpy ) FIDE महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 मध्ये भारताने यश मिळवत जागतिक बुद्धिबळात इतिहास रचला आहे. नागपूरची दिव्या देशमुख आणि अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी या दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

23 जुलै रोजी पार पडलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. क्लासिकल डाव अनिर्णीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये निर्णायक खेळ करत हम्पीने विजय मिळवला.

दुसऱ्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुखने चीनच्या तान झोंग्यी हिला नमवून अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास रचला. महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

FIDE महिला वर्ल्ड कप 2025 ची विजेती भारतीयच असणार आहे. अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये होणार आहे. अंतिम फेरी आता दोन भारतीय खेळाडूंमध्ये, म्हणजेच दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात होणार असून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com