LSG VS PBKS: लखनौ सुपर जायंट्सने पंजाबचा 21 धावांनी केला पराभव

LSG VS PBKS: लखनौ सुपर जायंट्सने पंजाबचा 21 धावांनी केला पराभव

आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव केला.
Published by :
Dhanshree Shintre

आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव केला. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत आठ गडी गमावून 199 धावा झाल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने दमदार सुरुवात केली मात्र संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 177 धावा केल्या. पंजाबकडून शिखर धवनने 70 धावांची दमदार खेळी केली. तर लखनौकडून मयंक यादवने तीन विकेट घेतल्या.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी 35 धावांची सलामी दिली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने केएल राहुलला बाद केले. राहुलने केवळ 15 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलला मोठी खेळी करता आली नाही. तो 9 धावांवर बाद झाला. यानंतर क्विंटनने 34 चेंडूंचा सामना करत आयपीएल कारकिर्दीतील 21 वे अर्धशतक झळकावले.

यानंतर निकोलस पूरनने मैदानात उतरताच चौकार आणि षटकार खेचले आणि 21 चेंडूत 42 धावा केल्या, मात्र रबाडाने त्याचा डाव संपवला. त्यानंतर शेवटी कृणाल पांड्याने 22 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे लखनौने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 199 धावा करुन विजय मिळवला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com