Mary Kom Retirement: मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्तीची केली घोषणा

Mary Kom Retirement: मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्तीची केली घोषणा

मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मेरी कोम ही सहा वेळा विश्वविजेती आणि 2012 ऑलिम्पिक पदक विजेती आहे. वयोमर्यादेमुळे निवृत्ती घेत असल्याचं तिने सांगितलं.

मेरी कोमने 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच मेरी कोमने 2005, 2006, 2008 आणि 2010 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॉक्सर ठरली. मेरी कोम ही सहा वेळा विश्वविजेती आणि 2012 ऑलिम्पिक पदक विजेती आहे.

तिच्यात खेळण्याची भूक अजूनही कायम आहे, परंतु वयोमर्यादेमुळे तिला आपल्या कारकिर्द थांबवावी लागणार असल्याचे मेरीने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com