जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा प्रवेश, बीसीसीआयने केले जाहीर

जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा प्रवेश, बीसीसीआयने केले जाहीर

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित T20I मालिकेतून बाहेर पडला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित T20I मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने तीन सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी मोहम्मद सिराजचा टी-20 संघात समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा T20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये आणि तिसरा T20 सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये होणार आहे. दोन्ही सामने IST संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होणार आहे.

जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. भारताने बुधवारी पहिला टी-२० सामना ८ गडी राखून जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा प्रवेश, बीसीसीआयने केले जाहीर
हरभजन सिंग पुन्हा एकदा मैदानात परतणार, लोकप्रिय क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणार

मोहम्मद सिराजने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत फक्त 5 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 41.80 च्या सरासरीने आणि 10.45 च्या इकॉनॉमीने फक्त 5 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने 27 फेब्रुवारी 2022 रोजी धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध टी-20 स्वरूपातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या सामन्यात त्याने 4 षटकात 22 धावा देत 1 बळी घेतला होता.

जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा प्रवेश, बीसीसीआयने केले जाहीर
सात ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या स्पर्धा कशी, कुठे होणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com