MS Dhoni Latest News Update
MS Dhoni Latest News Update

"धोनीच्या डोळ्यांत अश्रू अन् ड्रेसिंग रुममध्ये सर्वजण सुन्न...", कर्णधारपद सोडल्यावर फ्लेमिंगही झाला भावुक

आयपीएल २०२४ चा थरार आजपासून सुरु होणार असून सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.

आयपीएल २०२४ चा थरार आजपासून सुरु होणार असून सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, सीएसकेच्या संघात मोठे फेरबदल करण्यात आले. यंदाच्या हंगामात एम एस धोनी नव्हे, तर मराठमोळा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर चेन्नईची धुरा असणार आहे. धोनीनं कॅप्टन्सी सोडल्याचं जाहीर झाल्यावर चाहत्यांनाच नाही, तर माजी दिग्गज खेळाडूंनाही धक्का बसला. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनं म्हटलं, आम्ही याबाबत आधीच माहिती होती. आम्ही नवीन नेतृत्व तयार करत आहोत. भविष्याला पाहून हा निर्णय घेणं आवश्यक होतं.

फ्लेमिंगने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, धोनीच्या डोळ्यांत अश्रू होते. सर्वकाही सुन्न झालं होतं. ड्रेसिंग रुममध्ये खूप साऱ्या भावना होत्या. खूप सारे अश्रू. ड्रेसिंग रुममध्ये सर्वांचे डोळे पाणावलेले होते. प्रत्येक जण भावुक होता. सर्वजण भावनाविवश असताना ऋतुराज गायकवाडला शुभेच्छा दिल्या. ऋतुराज धोनीच्या या यशस्वी वाटचालीला पुढे नेण्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे. जेव्हा धोनीनं पहिल्यांदा कर्णधारपद सोडलं, तेव्हा आम्ही तयार नव्हतो. पण यावेळी आम्हाला आधीच ही गोष्ट माहित होती.

धोनीनं पहिल्यांदा २०२२ मध्ये सीएसकेचं कर्णधारपद सोडलं होतं आणि त्याच्या जागेवर जडेजाला कर्णधार बनवलं होतं. परंतु, जडेजा कर्णधार म्हणून यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर धोनीनं पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. धोनीच्या कॅप्टन्सीत २०२३ मध्ये सीएकसे पुन्हा एकदा चॅम्पियन ठरला होता. धोनीनं सीएसकेला पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकवून दिला आहे. आता ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेची आयपीएलमधील कामगिरी कशी असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com