MS Dhoni Helicopter Shot Video Viral
MS Dhoni Helicopter Shot Video Viral

धोनीनं CSK च्या गोलंदाजांची केली धुलाई! नेट प्रॅक्टिस करताना मारला जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट, व्हिडीओ व्हायरल

आयपीएलआधीच एम एस धोनीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय, व्हिडीओ एकदा पाहाच
Published by :

आयपीएलचा थरार २२ मार्चपासून सुरु होणार असून 'येलो आर्मी' चेन्नई सुपर किंग्जला सपोर्ट करण्यासाठी सज्ज झाली आहे. तत्पूर्वी, सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सर्व क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला आहे. आयपीएलचा पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे. अशातच आता धोनीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं हा सामना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण नेटमध्ये सरावादरम्यान धोनीनं हेलिकॉप्टर शॉट मारून पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

ही आयपीएल धोनीचा शेवटचा हंगाम असणार आहे, अशी चर्चा क्रीडाविश्वात रंगू लागल्या आहेत. नेट्समध्ये सराव करताना सीएसकेच्या गोलंदाजांची धोनीनं चांगलीच धुलाई केल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

इथे पाहा धोनीचा व्हायरल व्हिडीओ

सीएसकेचा संपूर्ण संघ : एम एस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश थीक्षाना, रचिन रविंद्र, शार्दुल ठाकूर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्तफिजूर रहमान, अवनीश राव अरावली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com