MS Dhoni Catch Video Viral
MS Dhoni Catch Video Viral

0.6 सेकंदांचा रिअ‍ॅक्शन टाईम, २.३ मीटरची उडी, धोनीनं घेतला जबरदस्त झेल, Video पाहून व्हाल थक्क

सीएसकेनं गुजरातला ६३ धावांनी पराभूत केलं. परंतु, स्टार विकेटकीपर एम एस धोनीनं हवेत उडी मारून घेतलेला झेल या सामन्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
Published by :

गुजरात टायटन्सविरोधात काल बुधावारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दणदणीत विजय मिळवला. सीएसकेनं गुजरातला ६३ धावांनी पराभूत केलं. परंतु, स्टार विकेटकीपर एम एस धोनीनं हवेत उडी मारून घेतलेला झेल या सामन्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. ४२ वर्षांच्या धोनीनं जबरदस्त क्षेत्ररक्षण करून विजय शंकरचा झेल घेतला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. धोनीचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

धोनीनं घेतलेल्या अप्रतिम झेलच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेही मोठं विधान केलं आहे. ''आणखी एक सीजन माही", अशाप्रकारचं कॅप्शन लिहून इरफानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसच सुरेश रैनानेही पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, "टायगर अभी जिंदा है."

इथे पाहा व्हिडीओ

धोनीनं ०.६ सेकंदाचा रिअॅक्शन टाईम आणि २.३ मीटर उडी मारून थक्क करणारा झेल घेतला. धोनीच्या या झेलची क्रीडाविश्वात तुफान चर्चा रंगली आहे. डेरेल मिचेलच्या गोलंदाजीवर विजय शंकरने कव्हर ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न केला.

परंतु, बॅटची कडा लागल्यानं चेंडू स्टम्पच्या मागे गेला. अशातच धोनीकडे फक्त ०.६ सेकंदाचा वेळ होता. तेव्हा धोनीनं २.३ मीटरची उडी मारली अन् शंकरचा झेल टीपला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com