Mumbai Indians, IPL 2024
Mumbai Indians, IPL 2024

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार, कारण...

आयपीएल २०२४ सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
Published by :

आयपीएल २०२४ सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका सुरुवातीचे सामने खेळणार नाहीय. बांगालादेशविरोधात झालेल्या वनडे सीरिजमध्ये मदुशंकाला दुखापत झाली होती. त्यामुळे मदुशंका या सीरिजचा शेवटचा सामना खेळणार नाही. तसच आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही तो मुकणार आहे.

श्रीलंकाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान दिलशान मदुशंकाला दुखापत झाली होती. २६ व्या षटकात गोलंदाजी करत असताना त्याला दुखापत झाली होती. मदुशंकाने ६.४ षटक गोलंदाजी केली होती आणि त्या षटकातच तो दुखापग्रस्त झाला आणि त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं. त्याने दोन विकेट घेतले होते. परंतु, दुखापत झाल्याने त्याला पुढील सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मदुशंकाच्या स्नायुंमध्ये वेदना होत आहेत. या कारणामुळे तो या सीरिजमध्ये पुढील सामन्यांचा भाग राहणार नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, मदुशंका आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळणार नाहीय. तर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटलं की, दिलशान मदुशंका याच्या दुखापतीचा रिपोर्ट रविवारी मिळाला. त्याला फिट व्हायला किती वेळ लागेल, याबाबत ठामपणे सांगता येत नाही. तो श्रीलंकेत पोहोचल्यावर हाय-परफॉरमन्स सेंटरमध्ये त्याचं निरीक्षण केलं जाईल.

मुंबई इंडियन्सने ४.६ कोटींमध्ये केलं खरेदी

दिलशान मदुशंकाला आयपीएल लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सने ४.६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. मुंबई इंडियन्सला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, मदुशंका आता सुरुवातीचे सामने खेळणार नसल्याने आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com