IPL 2024: आयपीएल (IPL) 2024 साठी मुंबई इंडियन्स नवीन जर्सी लॉंच

IPL 2024: आयपीएल (IPL) 2024 साठी मुंबई इंडियन्स नवीन जर्सी लॉंच

आयपीएल (IPL) 2024 ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी अर्धच वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आयपीएल (IPL) 2024 ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी अर्धच वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, आयपीएलमधील सर्वात मोठा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आयपीएलसाठी तयारी करत आहे. यासोबतच संघ इतर लीगमध्येही सहभागी होत असून, त्यासाठीची तयारीही सुरू आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्सने त्यांच्या जर्सीचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सची जर्सी मोनिषा जयसिंग हिने डिझाईन केली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ वेळा विजेतेपद पटकावले असून सहाव्यांदा IPLची ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्सच्या नवीन जर्सीचे डिझाईन चाहत्यांना आवडल्याचे पाहायला मिळत आहे. चाहते सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नवीन जर्सीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करीत आहेत.

२२ मार्च ते ७ एप्रिल या दरम्यानचे आयपीएल वेळापत्रक जाहीर झाले असून यात मुंबई इंडियन्सचा संघ ४ सामने खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना हा २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. गेल्या दोन पर्वात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व सांभाळलं होतं. आता त्याच संघाविरोधात मैदानात उतरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com