MI VS RR: मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव! राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून विजय

MI VS RR: मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव! राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून विजय

आयपीएलच्या 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला.
Published by :
Dhanshree Shintre

आयपीएलच्या 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. तसेच सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचबरोबर मुंबईला आतापर्यंत पहिला विजय मिळवता आला नाही आणि आता मुंबई इंडियन्स 10 व्या स्थानावर आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सने 126 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याचा राजस्थानने 15.3 षटकांत चार गडी गमावून पूर्ण केला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला सलग विजयी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सकडून रियाग परागने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूत 54 धावा केल्या. परागने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने आर अश्विन 16 सोबत चौथ्या विकेटसाठी 32 धावा जोडल्या. परागने शुभम दुबे नाबाद 8 सोबत पाचव्या विकेटसाठी 39 धावांची अखंड भागीदारी केली.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या एमआयची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईच्या विजयासाठी आणखी एका सामन्याची वाज पाहावी लागणार आहे. मुंबईचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर आहे. 7 एप्रिलला म्हणजेच रविवारी वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यानंतर 11 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना होणार आहे. हे सामने वानखेडे स्टेडियमवर असतील. या सामन्यात नानेफेकीचा कौल खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com