Hardik Pandya vs Natasa Stankovic
Hardik Pandya vs Natasa Stankovic

हार्दिक पंड्याचा पत्नीसोबत होणार नाही घटस्फोट? नताशा स्टॅनकोविकच्या इन्स्टाग्रामच्या नव्या पोस्टची होतेय चर्चा

हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता.
Published by :

Hardik Pandya vs Natasa Stankovic Divorce : हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता. परंतु, या चर्चांमध्ये आता एक नवा ट्वीस्ट समोर आला आहे. नताशाने शेअर केलेल्या नवीन इन्स्टाग्राम पोस्टने दोघांमध्ये घटस्फोट होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. नताशाने हार्दिकसोबत लग्नसमारंभात काढलेले फोटो इन्स्टाग्रामवर रिस्टोर केले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असून घटस्फोट होणार नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. परंतु, दोघांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी कृणाल पंड्याच्या सोशल मीडिया पोस्टवर नताशाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे नताशाने अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलं होतं की, ती पंड्या कुटुंबाशी अजूनही जोडलेली आहे. याचदरम्यान नताशाने इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या. नताशाने काही दिवासांपूर्वी ड्रायव्हिंगच्या नियमांचा फोटो शेअर केला होता. त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला होता.

नताशाने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर केले रिस्टोर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नताशाने हार्दिक पंड्यासोबत असलेले लग्नाचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर रिस्टोर केले आहेत. नताशाने हे फोटो इन्स्टाग्रामवरून हटवले होते. पण आता नताशाने पुन्हा हे फोटो इन्स्टाग्रामवर रिस्टोर केले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये सर्वकाही नॉर्मल असल्याचं बोललं जात आहे. परंतु, घटस्फोटाबाबत दोघांकडून अजूनही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हार्दिक आणि नताशाने २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. कोरोना काळात लग्न झाल्यानं दोघांना लग्नाचं ग्रँड सेलिब्रेशन करणं शक्य झालं नाही. त्यामुळे गतवर्षी उदयपूरमध्ये त्यांनी लग्नासमारंभाचं ग्रँड सेलिब्रेशन केलं होतं. या सोहळ्याला दिग्गज क्रिकेटर्स आणि बॉलिवूडच्या सेलिब्रेटिंगी उपस्थिती लावली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com