नीरज चोप्राने अचूक निशाणा! वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये एन्ट्री; ऑलिम्पिकसाठी पात्र

नीरज चोप्राने अचूक निशाणा! वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये एन्ट्री; ऑलिम्पिकसाठी पात्र

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शानदार खेळ दाखवला.
Published on

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शानदार खेळ दाखवला. नीरजने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. सोबतच, ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही क्वालिफाय झाला आहे.

नीरज चोप्राला गट-अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. यात गतविजेते अँडरसन पीटर्स आणि ज्युलियन पीटर्स यांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीम आणि जेकब वडलेच या स्टार खेळाडूंना ब गटात ठेवण्यात आले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी स्वयंचलित पात्रता चिन्ह 83 मीटर होते. तर, नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे.

यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रासह जगभरातील ३७ भालाफेकपटूंनी भाग घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com