ऑलिम्पिक 2024
पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची पॅरा शूटर रुबिनानं मिळवलं आणखी एक पदक
अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी १० मीटर अयर रायफल (एसएच1) प्रकारात भारताला अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई करून दिली होती.
अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी १० मीटर अयर रायफल (एसएच1) प्रकारात भारताला अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई करून दिली होती. या दोघींना मिळालेल्या यशानंतर मनीष नरवाल यानेही रौप्य पदकासाठी निशाणा मारला. त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात पदकी निशाणा साधला होता. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी रुबिना फ्रान्सिस हिने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यातील हे पाचवे पदक आहे. याशिवाय नेमबाजी क्रीडा प्रकारातील भारताचे हे चौथे पदक आहे. नेमबाजांशीवाय प्रीती पाल हिने मैदानी खेळात कांस्य पदकाची कमाई केली आहे.