भारत-पाकिस्तानमध्ये होणार अंतिम सामना; कोण बनणार चॅम्पियन?

भारत-पाकिस्तानमध्ये होणार अंतिम सामना; कोण बनणार चॅम्पियन?

क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असतो. भारत-पाकिस्तान यांच्यातील जबरदस्त लढत चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असतो. अशातच, आशिया चषक सुरु होण्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 सप्टेंबरला 2023 आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र, याआधीही भारत-पाकिस्तान यांच्यातील जबरदस्त लढत चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

आज 2023 इमर्जिंग एशिया कपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानचा संघ श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला. भारत-अ आणि पाकिस्तान-अ हे दोन्ही संघ आज म्हणजेच 23 जुलै रोजी विजेतेपदासाठी सामना खेळणार आहेत. हा सामना भारताच्या वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल.

2023 इमर्जिंग आशिया कपचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान-अ आणि श्रीलंका-अ यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तान-अ संघाने हा सामना सहज जिंकला. पाकिस्तान-अ संघाने प्रथम खेळून 50 षटकांत 322 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंका-अ संघाला ४५.४ षटकांत २६२ धावाच करता आल्या. पाकिस्तान-अ कडून उमेर युसूफने 88 आणि कर्णधार मोहम्मद हरिसने 52 धावा केल्या. त्याचवेळी अविष्का फर्नांडोने श्रीलंका-अ संघाकडून सर्वाधिक 97 धावा केल्या.

2023 इमर्जिंग आशिया कपचा दुसरा उपांत्य सामना कमी स्कोअरिंगचा होता. भारत-अ संघ प्रथम खेळून 49.1 षटकांत अवघ्या 211 धावांवर गारद झाला. यानंतर बांगलादेश-अ संघाने एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या. मात्र, भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत अखेर 51 धावांनी सामना जिंकला. भारत अ संघाकडून निशांत संधूने सर्वाधिक ५ बळी घेतले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com