Pakistan Team Lokshahi
क्रीडा
T20 World Cup: भारतानंतर पाकिस्तानने जाहीर केला वर्ल्ड कपसाठी संघ
वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचे संघात पुनरागमन
नुकतीच आशिया चषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पाकिस्तान संघ उत्तम कामगिरी करताना दिसला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन सामने झाले. एक भारत, एक पाकिस्तान असा विजय दोन्ही संघाने प्राप्त केला होता. त्यांनतर लगेचच पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी- 20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. यासाठी सर्वच देश आपापल्या संघाची घोषणा करत आहे. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर आता पाकिस्तानने देखील आपल्या संघाची घोषणा केली आहे. या वर्ल्ड कपची सुरवात सुद्धा भारत- पाकिस्तान महामुकाबल्याने होणार आहे.
असा असेल पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदरी अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर