रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेबाहेर

रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेबाहेर

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारत इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे इंग्लडविरोधातील कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार असून या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. 19 फेब्रुवारीला इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी एकूण 18 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या 2 सामन्यांसाठी जाडेजाची निवड करण्यात आली नाही.

जाडेजाला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी दुखापत झाली होती. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जाडेजाच्या अंगठ्याला ही दुखापत झाली. जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. जाडेजाला या दुखापतीतून सावरण्यासाठी 5-6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
  • दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
  • तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
  • चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

कसोटी संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com