Robin utthapa
Robin utthapa Team Lokshahi

स्टार भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पा निवृत्त

रॉबिन उथप्पाने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. टी-20 विश्वचषक 2007 च्या विजेत्या संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 14 सप्टेंबर रोजी रॉबिन उथप्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली होती. विशेष बाब म्हणजे 14 सप्टेंबर रोजी 2007 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याला 15 वर्षे पूर्ण झाली. यामध्ये रॉबिन उथप्पानेही भारताला बॉलआउटमध्ये महत्त्वाचा विजय मिळवून दिला होता.

Robin utthapa
सौरव गांगुली, जय शाह यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

रॉबिन उथप्पा म्हणाला की, आपल्या देशाचे आणि कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान होता. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत होतो, मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून माझी निवृत्ती जाहीर करतो.

गेल्या 20 वर्षांपासून तो वेगवेगळ्या स्तरावर आपल्या राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. अनेक चढउतारांसह हा एक अद्भुत प्रवास आहे. या दरम्यान मी माणूस म्हणून खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला आणि शिकलो, अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली.

असा होता रॉबिन उथप्पाचा क्रिकेट मधला प्रवास

रॉबिन उथप्पाने 2006 साली भारतासाठी वनडे पदार्पण केले. त्याने एकूण 46 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्याने 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 अर्धशतकेही केली आहेत. त्याच वेळी, रॉबिन उथप्पाने भारतासाठी 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.90 च्या सरासरीने 249 धावा केल्या. रॉबिन उथप्पा भारताकडून शेवटचा 2015 मध्ये खेळला होता, जेव्हा त्याची झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवड झाली होती.

तसेच, रॉबिन उथप्पाने एक यशस्वी फलंदाज असल्याचेही वारंवार सिद्ध केले आणि त्याचे नाव सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे. रॉबिनने आयपीएलमध्ये एकूण 205 सामने खेळले. यामध्ये त्याने 27.51 च्या सरासरीने 4952 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये २७ अर्धशतके झळकावली. तो चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये खेळला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com