Rohit Sharma
Rohit Sharma

T20 WC 2024: कर्णधार रोहित शर्माची विश्वविक्रमाला गवसणी; टी-२० च्या इतिहासात 'हा' कारनामा करणारा ठरला एकमेव फलंदाज

विराट कोहली आणि रिषभ पंत स्वस्तात माघारी परतले. परंतु, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
Published by :

Rohit Sharma Most Fours Record In T20 WC History : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा दुसरा सेमीफायनलचा सामना गुरुवारी गयानामध्ये रंगला. भारताने प्रथम फलंदाजी करत ८ षटकांमध्ये ६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्यात पावसाने खोडा घातल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला होता. जवळपास एक तासांच्या विश्रांतीनंतर सेमीफायनलचा सामना पुन्हा सुरु झाला. विराट कोहली आणि रिषभ पंत स्वस्तात माघारी परतले. परंतु, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

कर्णधार रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड

टी-२० वर्ल्डकपमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात ९२ धावांची वादळी खेळी केली होती. त्यानंतर काल गुरुवारी इंग्लंडविरोधात झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यातही रोहितने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात रोहितने विश्व विक्रमाला गवसणी घातली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त चौकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. रोहित अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज बनला आहे.

भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने ३९ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट कोहली ९ धावांवर बाद झाला. रिषभ पंतला धावांचा सूर न गवसल्याने तो अवघ्या ४ धावा करून तंबुत परतला. सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ४७ धावांची आक्रमक खेळी केली. तर हार्दिक पंड्याने १३ चेंडूत २३ धावा केल्या. रवींद्र जडेजा १७ धावांवर नाबाद राहिला. तसच गोलंदाजांनीही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराह (२), अक्षर पटेल (३), कुलदीप यादवने (३) विकेट घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com