Rohit Sharma
Rohit Sharma

IND vs Aus, T20 World Cup: कांगांरुंना रडवलं! रोहित शर्माचं वादळी अर्धशतक; ४१ चेंडूत कुटल्या ९२ धावा, पाहा व्हिडीओ

टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील सुपर-८ चा निर्णायक सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
Published by :

Rohit Sharma Batting Video : टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील सुपर-८ चा निर्णायक सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियममध्ये हा महामुकाबला होत असून ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मैदानात उतरलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहितने धडाकेबाज फलंदाजी करून ४१ चेंडूत ९२ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा सूर न गवसलेल्या रोहितने आजच्या सामन्यात वादळी खेळी केली. याचसोबत रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये २०० षटकारांचं माईलस्टोन गाठलं आहे.

टी-२० वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर लीग सामन्यांमध्ये आणि सुपर ८ मध्ये रोहितला धावांसाठी संघर्ष करावा लागला. परंतु, सुपर ८ च्या आजच्या तिसऱ्या सामन्यात रोहितने ऑस्ट्रेलियाविरोधात आक्रमक फलंदाजी केली. रोहितने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकार ठोकून ९२ धावांची अर्धशतकी खेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com