U19 World Cup 2024: आयसीसी अंडर-19 मध्ये मराठमोळ्या सचिन धसचे आणि उदयचे दमदार शतक

U19 World Cup 2024: आयसीसी अंडर-19 मध्ये मराठमोळ्या सचिन धसचे आणि उदयचे दमदार शतक

आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 च्या सुपर सिक्स सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने नेपाळला 298 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 च्या सुपर सिक्स सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने नेपाळला 298 धावांचे लक्ष्य दिले आहे. सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 297/5 धावा केल्या. धस 48 व्या षटकात 116 धावांवर बाद झाला, तर 6 रनने शेवटच्या षटकात तिहेरी धावसंख्या गाठली आणि 100 धावांवर बाद झाला. नेपाळकडून गुलसन झा याने 3/56 अशी शानदार गोलंदाजी केली.

आकाश चंदलाही एक विकेट मिळाली. सुपर सिक्सच्या गटात भारत टेबल टॉपर आहे. ग्रुप स्टेजपासून भारताने एकही सामना गमावलेला नाही. नेपाळविरूद्धच्या या सामन्यात भारताची अवस्था 3 बाद 62 धावा अशी झाली होती. मात्र बीडच्या सचिन धसने शतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. सचिन धसने 101 चेंडूत 116 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने कर्णधार उदय सहारनसोबत चौथ्या विकेटसाठी 215 धावांची दमदार भागीदारी रचली.

गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या सरफराज खानचा भाऊ मुशीर खानला आज फारशी संधी मिळाली नाही. त्याने शेवटी येऊन सात चेंडूंत नऊ धावा केल्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि एकवेळ भारताने 62 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली.

दरम्यान, गुलशन झाने ही जोडी फोडली. त्याने धसला 116 धावांवर बाद केलं. दुसऱ्या बाजूने उदय सहारन 90 धावांवर खेळत होता. त्याने धस बाद झाल्यानंतर आपले शतक पूर्ण केलं. मात्र शेवटच्या षकात गुलशनने त्याचीही शिकार केली. उदय सहारनने 107 चेंडूत 100 धावा केल्या. अखेर भारताने 50 षटकात 5 बाद 297 धावांपर्यंत पोहचला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com