सचिन तेंडुलकर ठरला डीपफेक व्हिडिओचा बळी; सरकारला केली 'ही' विनंती

सचिन तेंडुलकर ठरला डीपफेक व्हिडिओचा बळी; सरकारला केली 'ही' विनंती

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओचा बळी ठरला आहे.

Sachin Tendulkar : अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओचा बळी ठरला आहे. मास्टर ब्लास्टरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. या व्हिडिओमध्ये डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तो एका अ‍ॅपची जाहिरात करताना दाखवला जात आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, हा व्हिडिओ खोटा आहे, तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे. त्यांनी पुढे लिहिले की डीपफेकचा गैरवापर योग्य नाही. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अ‍ॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास लवकरात लवकर त्याची तक्रार करावी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करावी. यासोबतच सचिनने इलेक्ट्रॉनिक्स, आयटी मंत्रालय आणि या मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनाही यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

डीपफेक तंत्रज्ञान काय आहे?

डीपफेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरतो. या तंत्राद्वारे कोणाचीही बनावट प्रतिमा किंवा चित्र सहज तयार करता येते. तसेच, डीप लर्निंग, एआयचा एक प्रकार आहे, यामध्ये कोणतेही चित्र, ऑडिओ किंवा व्हिडिओ बनावट म्हणून दाखवण्यासाठी वापरले जाते. म्हणून त्याला डीपफेक तंत्रज्ञान म्हणतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com