Sahibzada Farhan
Sahibzada Farhan

Sahibzada Farhan : साहिबझादा फरहानचं अर्धशतकाचं सेलीब्रेशन; नेटकऱ्यांचा संताप,नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानचा साहिबझादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनवरून जोरदार वाद
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • साहिबझादा फरहानचं अर्धशतकाचं सेलीब्रेशन

  • पाकिस्तानचा साहिबझादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनवरून जोरदार वाद

  • अर्धशतक पूर्ण केलं आणि बॅट बंदुकीसारखी धरत गोळ्या झाडल्याची अ‍ॅक्शन

(Sahibzada Farhan) आशिया कप 2025 सुपर-4 फेरीतील भारत–पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहान अर्धशतक ठोकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनवरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. भारताने रविवारी (21 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात केली. अभिषेक शर्मा याच्या दमदार 74 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 172 धावांचं आव्हान 18.5 षटकांत पार केलं. पण सामन्यानंतर चर्चेत ठरलं ते फरहानच्या वादग्रस्त कृतीमुळे.

साहिबझादा फरहानने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि बॅट बंदुकीसारखी धरत गोळ्या झाडल्याची अ‍ॅक्शन केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अद्याप ताज्या असताना या सेलिब्रेशनवर संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर याला जोरदार विरोध होत आहे. अनेकांनी ही कृती भारताच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याचं म्हटलं. त्यामुळे फरहानवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

साहिबझादा फरहान याने 58 धावा केल्या. यामध्ये त्याने अर्धशतक झळकवल्यानंतर ज्या पद्धतीने सेलीब्रेशन केलं ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे. या घटनेवर अनेकांच्या प्रतिकिया येत असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com