RR VS LSG: सॅमसन आणि जुरेल यांनी केली नाबाद अर्धशतके! राजस्थानने लखनौचा 7 गडी राखून केला पराभव

RR VS LSG: सॅमसन आणि जुरेल यांनी केली नाबाद अर्धशतके! राजस्थानने लखनौचा 7 गडी राखून केला पराभव

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थानचा नऊ सामन्यांमधील हा आठवा विजय आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थानचा नऊ सामन्यांमधील हा आठवा विजय आहे. कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्या शानदार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुडाच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या विकेटसाठी सॅमसन आणि जुरेल यांच्या शतकी भागीदारीमुळे राजस्थानने एक षटक शिल्लक असताना तीन विकेट्सवर 199 धावा करून विजय मिळवला.

या विजयासह राजस्थानचा संघ प्लेऑफच्या अगदी जवळ आला आहे. राजस्थान नऊ सामन्यांत आठ विजय आणि एक पराभवासह 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर सामना गमावल्यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ पाच विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. राजस्थानचा नऊ सामन्यांमधला हा आठवा विजय असून तो पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. यासह राजस्थानने प्लेऑफमधील आपला दावा मजबूत केला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या ओपनर बॅट्समनने सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरू केली. मात्र, यशस्वी जयस्वाल 24 रन्स करुन माघारी परतला. यानंतर जोस बटलर सुद्धा 34 रन्स करुन माघारी परतला. मग संजू सॅमसन याने टिकून राहात स्कोअर पुढे नेण्यास सुरुवात केली. त्याला साथ देत असला रियान पराग अवघ्या 14 रन्स करुन आऊट झाला. मग ध्रूव जुरेल आणि संजू सॅमसन या दोघांनी चांगली पार्टनरशिप करत टीमला विजय मिळवून दिला.

दोन्ही संघाचे प्लेइंग 11:

राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11 :

संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग 11 :

केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकूर.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com