शोएबच्या लग्नानंतर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, घटस्फोट होऊन...

शोएबच्या लग्नानंतर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, घटस्फोट होऊन...

शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबतच्या तिसऱ्या लग्नाची फोटो पोस्ट केल्यानंतर याची पुष्टी झाली. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी मुलगीच्या शोएबपासून विभक्त झाल्याचे म्हंटले आहे.

Sania Mirza-Shoaib Malik : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबतच्या तिसऱ्या लग्नाची फोटो पोस्ट केल्यानंतर याची पुष्टी झाली. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी मुलगीच्या शोएबपासून विभक्त झाल्याचे म्हंटले आहे. आता यावर सानिया मिर्झा आणि तिच्या कुटुंबीयांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

शोएबच्या लग्नानंतर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, घटस्फोट होऊन...
सानियाने शोएबकडून घटस्फोट नाहीतर घेतला 'खुला', वडीलांची प्रतिक्रिया, जाणून घ्या काय अर्थ?

सानिया मिर्झाच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदन सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यामध्ये म्हंटले की, सानियाने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. मात्र, आज त्यांना सांगण्याची गरज आहे की, शोएबसोबत घटस्फोट होऊन काही महिने झाले आहेत. तिने शोएबला त्याच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच, त्याच्या आयुष्याच्या या नाजूक काळात, आम्ही सर्व चाहते आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही अटकळीत गुंतू नये आणि त्याच्या प्रायव्हसीच्या गरजेचा आदर करावा, अशी विनंतीही चाहत्यांना केली आहे.

दरम्यान, शोएब मलिकने 18 जानेवारी रोजी कराचीमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले होते. क्रिकेटरचे हे तिसरे लग्न आहे. सना जावेदनेही दुसरे लग्न केले आहे. यापूर्वी तिने अभिनेता उमेर जसवालशी लग्न केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com