सानियाने शोएबकडून घटस्फोट नाहीतर घेतला 'खुला', वडीलांची प्रतिक्रिया, जाणून घ्या काय अर्थ?

सानियाने शोएबकडून घटस्फोट नाहीतर घेतला 'खुला', वडीलांची प्रतिक्रिया, जाणून घ्या काय अर्थ?

शोएब मलिकने सना जावेदसोबत लग्न केले आहे. सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. पण, दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला नव्हता.

Shoaib-Sania Divorce : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. क्रिकेटरचे हे तिसरे लग्न आहे. याआधी त्याने टेनिसपटू सानिया मिर्झा आणि आयेशा सिद्दीकीसोबतही लग्न केले होते. सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. पण, दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला नव्हता. अशातच, शोएबने 20 जानेवारीला सनासोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले.

शोएबने 18 जानेवारीला सना जावेदसोबत कराचीमध्ये लग्न केले. यानंतर सानिया-शोएब यांचा घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला आहे. पण, आता शोएबच्या घटस्फोटाच्या वृत्तावर सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झाची प्रतिक्रिया समोर आली आहे. इम्रान मिर्झाने शोएबने सानियाला घटस्फोट दिल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. हा घटस्फोट नव्हता, तर खुला होता, असे त्यांनी म्हंटले आहे. म्हणजेच सानियाने शोएबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

खुला म्हणजे काय?

घटस्फोट आणि खुला यात फारसा फरक नाही. जेव्हा एखादी स्त्री विभक्त होण्याचा निर्णय घेते तेव्हा त्याला खुला म्हणतात. जेव्हा हा निर्णय पुरुषाच्या बाजूने होतो तेव्हा त्याला घटस्फोट म्हणतात. घटस्फोटानंतरही ती महिला तीन महिने पतीच्या घरीच राहते. कुराण आणि हदीसमध्येही त्याचा उल्लेख आहे. विभक्त होण्याचा निर्णय सानियानेच घेतला होता, हे सानियाच्या वडिलांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com